Menu Close

पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे दायित्व आमचेच असा विटनेर (जळगाव) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

हिंदूसंघटनाचा दिसे आविष्कार निमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाचे ।
राष्ट्र-धर्म रक्षणार्थ एकवटले धर्माभिमानी जळगाव आणि नंदुरबारचे ॥

माजी सरपंचांच्या पुढाकाराने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

जळगाव : पारोळा तालुक्यातील विटनेर गावातील जय सावता माळी मित्र मंडळ आणि माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांच्या पुढाकाराने गावातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी गावातील धर्माभिमान्यांनी सिद्धता केली. पंचक्रोशीतील गावांमध्ये प्रसार केल्याने सभेविषयी पुष्कळ उत्साह होता. आता या पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे दायित्व आमचेच, असे गावकर्‍यांनी सांगितले.

१. वक्त्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात केले. जय भवानी जय शिवाजी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, राम राम जय श्रीराम या घोषणांनी गाव दणाणले.

२. सभेचा आरंभ गावातील धर्माभिमानी श्री. दिनेश माळी यांनी शंखनादाने केला, तर सूत्रसंचालन धर्माभिमानी श्री. अरुण महाजन यांनी केले.

३. सभेचे वक्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांचा सत्कार माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांनी केला, तर श्री. विनोद शिंदे यांचा सत्कार श्री. रघुनाथ माळी यांनी केला.

४. श्री. विजय पाटील यांनी धर्मांधांचा उद्दामपणा आणि हिंदूसंघटनाची आवश्यकता विशद केली.

५. हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय श्री. विनोद शिंदे यांनी करून दिला.

६. या सभेला १२५ हून अधिक धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते. सभेनंतर गावकर्‍यांनी हा विषय पंचक्रोशीतील हिंदूंपर्यंत घेऊन जाऊ, असे सांगितले.

एकविरा मातेच्या मंदिरात प्रवचन

चोपडा येथील एकविरा मातेच्या मंदिरात साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर कु. जयश्री पाटील यांनी प्रवचन घेतले. प्रसारासाठी सौ. सीता गावडे यांनी पुढाकार घेऊन साहाय्य केले. या वेळी ३५ हून अधिक महिला उपस्थित होत्या. धर्माभिमानी महिलांनी मंगळवार आणि शुक्रवारी देवीच्या आरतीचे नियोजन केले. तसेच नियमित सत्संगाची मागणी केली.

श्रीराम मंदिरात स्वच्छता

पाचोरा येथील जामनेर रस्त्यावरील श्रीराम मंदिरात स्वच्छता करण्यात आली. यासाठी मंदिरातील पुजार्‍यांनी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. सौ. मनिषा नागणे यांनी प्रथमच सेवा करतांना पुढाकार घेऊन सेवेचे दायित्व घेतले. मंदिरात नियमित दर्शनाला येणार्‍या भाविकांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.

कान्हादेशाची कुलस्वामिनी श्री मनुदेवीला साकडे !

जळगाव : कान्हादेशाची कुलस्वामिनी असलेल्या श्री मनुदेवीला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी साकडे घालण्यात आले. श्री मनुदेवीला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. नरेंद्र पाटील, सौ. वर्षा पाटील, श्री. कमलाकर सोनवणे, सौ. अनिता सोनवणे, श्री. हिरामण वाघ, सौ. जानकी वाघ, श्री. गणेश सोनवणे उपस्थित होते.

जळगाव तालुक्यातील रिधूर गावातील श्री अवचित हनुमान (लोण्याचा मारुति) मंदिरात स्वच्छता करण्यात आली. या वेळी श्री. संभाजी सोनवणे, श्री. समाधान कोळी, सौ. मनीषा पाटील, श्री. गौरव राणे या स्थानिक भक्तांनी स्वत: सहभाग घेऊन सेवा केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जागृत देवस्थानामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी हनुमान मंदिराचे पुजारी, तसेच सनातन संस्थेचे श्री. हिरामण वाघ, सौ. जानकी वाघ, श्री. कमलाकर सोनवणे, श्री. भालचंद्र भंगाळे यांच्यासह धर्माभिमानी उपस्थित होते.

धरणगाव तालुक्यातील लाडली गावातील स्वयंभू लिंग असलेल्या महादेव मंदिरात स्थानिक ग्रामस्थ श्री. निवृत्ती पाटील, श्री. सुनिल पाटील, श्री. भगवान पाटील आणि श्री. गजानन पाटील यांच्यासह १० ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन मंदिराची स्वच्छता केली. त्यानंतर शंभू महादेवाला परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी श्री. हिरामण वाघ आणि श्री. कमलाकर सोनवणे उपस्थित होते.

वाघोदा येथे व्यसनाधीनता नष्ट करण्याचा आणि अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार

लाडली, तुरखेडा, नंदगाव येथील हिंदु राष्ट्र जागृती सभांमध्ये धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : वाघोदा येथे स्थानिक धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले होते. सभेला २०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. हिंदु धर्माभिमान्यांनी गावातील व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी आणि अनधिकृत वाजणार्‍या भोंग्यांविरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारणार आणि प्रति शनिवारी महाआरतीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विचार स्पष्ट केले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी हिंदूंनी संघटित होऊन सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढ्यासाठी सिद्ध असले पाहिजे, असे सांगितले.

लाडली गाव

धरणगाव तालुक्यातील लाडली गावातही हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्यात आली. सभेचे आयोजन गावातील धर्माभिमानी श्री. निवृत्ती पाटील, श्री. गजानन पाटील यांच्यासह गावातील अन्य धर्माभिमान्यांनी केले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. हिरामण वाघ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विचार कथन केले, तर कु. रागेश्री देशपांडे यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. सभेला १३५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

नंदगाव

जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील सभा श्री हनुमान मंदिरात घेण्यात आली. या वेळी ८० धर्माभिमानी उपस्थित होते.

तुरखेडा

तुरखेडा येथील वामन चौकात गावातील धर्माभिमानी श्री. गिरीश कोळी, बापू कोळी यांनी सभेचे आयोजन केले होते. या दोन्ही सभांना कु. रागेश्री देशपांडे आणि हिरामण वाघ यांनी संबोधित केले. सभेला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राबवलेल्या उपक्रमांमुळे धर्माभिमान्यांच्या राष्ट्र-धर्म कार्यातील सहभागात वाढ !

जळगाव : येथील चोपडा गावात हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांमुळे सर्वांचा राष्ट्र-धर्म कार्यातील सहभागही वाढला आहे.

१. लोहिया नगर भागातील श्री मुक्तेश्‍वर महादेव मंदिरात स्वच्छता करण्यात आली. या वेळी सौ. अन्नपूर्णा माळी, सौ. मनीषा माळी, सौ. सीमा माळी, सौ. सुनंदा माळी, सौ. सुमन माळी, सौ. ज्योती माळी, सौ. वर्षा धनगर यांनी पुढाकार घेऊन सेवा केली. तसेच आणखी कुठे सेवा असल्यास बोलवण्याविषयी सांगितले.

२. श्री हरेश्‍वर महादेव मंदिर, श्री अष्टविनायक मंदिर येथे स्वच्छता केली. या वेळी एका काकूंनी स्वच्छतेचे साहित्य आणून दिले. एका भाविकानेही स्वच्छतेत सहभाग घेतला. दक्षिण हनुमान मंदिर येथेही स्वच्छता करण्यात आली.

३. लोहियानगर भागातील श्री मुक्तेश्‍वर महादेव मंदिरात कु. जयश्री पाटील यांनी साधना आणि राष्ट्र या विषयावर प्रवचन घेतले.

४. गुजरवाडी येथेही साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर कु. जयश्री पाटील यांनी प्रवचन घेतले. या वेळी सौ. उषा पेंढारकर, सौ. भावना चौधरी, कु. रीना चौधरी, सौ. प्रियंका चौधरी, सौ. सुनंदाबाई, सौ. योगिता गुजर यांनी परिसरात प्रवचनाचा प्रसार अन् पूर्वसिद्धता केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *