Menu Close

कुडलू, कासारगोड (केरळ) येथे प्रवचन

भारतातील विविध राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

केरळ : आज देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी आणि सैनिक यांची स्थितीही दयनीय झाली आहे. गोहत्या, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, साधु-संतांचा अवमान, हिंदु मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात हिंदु धर्मावर होत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे. हे कार्य करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रा मोगेर यांनी केले.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कासारगोड जिल्ह्यातील कुडलू येथील श्री शैल महादेवाच्या मंदिरात प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा २५० हून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *