Menu Close

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संत आणि मान्यवर यांनी दिलेला संदेश अन् अभिप्राय !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र उभारणीच्या कार्यात सनातन संस्था कटिबद्ध असल्याचा अभिमान ! – श्री. अवधूत वाघ, प्रवक्ता, भाजप

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, तसेच सनातन संस्थेला शुभेच्छा देतो. सनातन संस्थेचे समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र उभारणीच्या कार्यात सनातन संस्था कटिबद्ध आहे, हे पाहून आनंद होतो आणि अभिमानही वाटतो.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या कार्यात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत ! – श्री. रणजीत सावरकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्या हिंदु राष्ट्राच्या कार्यात आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला खात्री वाटते की, हिंदु राष्ट्र येणारच ! भारत हे हिंदु राष्ट्र आहे आणि हिंदु राष्ट्रातच अहिंदू पण सुरक्षित रहातील. सर्वांच्या कल्याणासाठी हे हिंदु राष्ट्र आहे.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे ज्ञानाचा महासागर ! – श्री. जी. राधाकृष्णन्, अध्यक्ष, शिवसेना तमिळनाडू

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक प्रणाम ! गुरुदेव आमचे प्रेरणास्रोत आहेत. गुरुदेव नेहमीनामजपादी साधना सांगतात. ते ज्ञानाचा महासागर आहेत. त्यांनी संकलित केलेल्या ३०० हून अधिक ग्रंथांच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळत आहे. आणखी ४ सहस्र ग्रंथ निर्माण होतील, एवढे त्यांच्याकडे ज्ञान आहे. हिंदु जनजागृती समितीद्वारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करण्यात येते. ही अधिवेशने हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात मैलाचा दगड आहेत. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या आश्रमात ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ची खर्‍या अर्थाने प्रचीती येते. तेथे कोणताही भेदभाव नसून सर्व हिंदुत्वनिष्ठांना समान वागणूक दिली जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *