भोंगे हटवणे आणि अनधिकृत बांधकामे पाडणे हे दोन्ही आदेश न्यायालयाचेच आहेत; मात्र धर्मांधांना घाबरून भोंगे, मशिदी, दर्गे अनधिकृत असले, तरी प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस केले जात नाही. मंदिरे मात्र अनधिकृत ठरवून पाडली जातात. प्रशासनाची ही हिंदूविरोधी कृती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : गोवंडी, देवनार बसआगाराजवळील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर ८ मे या दिवशी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भुईसपाट करण्यात आले.संतापजनक गोष्ट म्हणजे हे मंदिर वैध असल्याविषयीची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी अधिवक्ता शिवहर्ष मिश्रा यांनी सांगितले आहे.
तरीही याविषयी कोणतीही नोंद न घेता मुंबई महानगरपालिकेकडून हे मंदिर पाडण्यात आले. (हिंदूंनो, याला उत्तरदायी असणार्या शासकीय अधिकार्यांच्या विरोधात वैध मार्गाने कारवाई करण्यासाठी पावले उचला आणि अशा अधिकार्यांची नावे सनातन प्रभातलाही कळवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) विशेष गोष्ट म्हणजे अधिवक्ता शिवहर्ष मिश्रा यांचे घर वर्ष २००० मध्ये बांधण्यात आले आणि त्याच्या बाजूला असलेले श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला नाही; मात्र मंदिर पाडण्यात आले.
अयोध्येत मंदिर बांधायला निघालेल्यांच्या कानात मुंबईतील पुरातन मंदिरे पाडल्याचा आवाज जात नाही, हे दुर्दैव ! – अधिवक्ता शिवहर्ष मिश्रा
आमच्या तीन पिढ्या या जागेत रहात आहेत. आम्ही जागेचा कर भरत आहोत. वर्ष १९५८ मध्ये या मंदिराविषयी आम्हाला शासनाकडून अधिकारपत्रही मिळाले आहे. देवासाठी मुंबईत जागा नाही का ? आमच्या आराध्य देवता राहिल्या नाहीत, तर हिंदू संस्कार कुठून घेणार ? हिंदू संघटित कसे होणार ? शुक्रवारी नमाजाच्या वेळी मशिदींच्या समोरील रस्ते भरून जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून पोलीस पाठवले जातात; मात्र दुसरीकडे हिंदूंची मंदिरे मात्र तोडली जातात. हिंदुत्वनिष्ठ शासन असूनही या विरोधात आवाज उठवत नाही. शासनाला नेमके काय अपेक्षित आहे ? ‘आधीचे शासन बरे होते’, असे म्हणण्याची वेळ आताच्या शासनाने आणली आहे. ‘मंदिरे पाडली, तर हिंदू कुठे जाणार ?’, असा प्रश्न खरे तर हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या पक्षांनी उपस्थित करायला हवा. अयोध्येत राममंदिर बांधायला निघालेल्यांच्या कानामध्ये येथील पुरातन मंदिरे पाडल्याचा आवाज जात नाही, हे दुर्दैव आहे. अशाने हिंदूंची श्रद्धा दुखावली जाईल. अशाने येथे पाकिस्तानसारखी स्थिती निर्माण होत असल्याचे म्हणावे लागेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात