हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन
कोपरखैरणे (नवी मुंबई) : सहस्रो क्रांतिकारकांच्या बलिदानाने हा भारताचा राष्ट्रध्वज उभा राहिला आहे. आजही सहस्रो सैनिकांच्या त्यागाने हा तिरंगा गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतियांच्या आशा आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधत्व करतो. त्यामुळे त्याचा सन्मान राखा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. नीलेश देशमुख यांनी केले. येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत २५ जानेवारी या दिवशी ते विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रबोधन करत होते. यानंतर राष्ट्रध्वजातील रंगांचे अर्थ विचारून विद्यार्थ्यांना त्याची महती सांगण्यात आली. या मार्गदर्शनाचा २०० विद्यार्थी आणि शिक्षक यांनी लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात