शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यासाठी खाजगी विधेयक का हवे ? केंद्र सरकार असे विधेयक स्वतःहून का आणत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : भाजपचे खासदार रमेश बिधुडी संसदेच्या पुढील अधिवेशनात शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करण्यासाठीचे खाजगी विधेयक मांडणार आहेत. ज्या शाळा भगवद्गीता शिकवणार नाहीत, त्यांची मान्यता रहित करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. ‘भगवद्गीतेतील विचार आणि शिक्षण यांमुळे युवा पिढीला तिचे व्यक्तीमत्व घडण्यास साहाय्य होईल. तसेच गीतेच्या विचारांनी उत्तरदायी नागरिक सिद्ध होतील’, असे मत बिधुडी यांनी व्यक्त केले आहे. हे विधेयक लागू करण्यासाठी सरकारला ५ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, अशी माहिती बिधुडी यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात