Menu Close

अमरावती येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुखांकडून शौर्य जागरण उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना ‘रामरक्षा’ लघुग्रंथ भेट

अमरावती : हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत येथील माळीपुरा भागातील कानोबा देवस्थान येथे शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १ ली ते १० वीपर्यंतच्या ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल जगदाळे यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्रीमती सुनीता येवतकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सनातन-निर्मित ‘रामरक्षा’ हा लघुग्रंथ भेट म्हणून दिला आणि असे उपक्रम नेहमीच घेण्याविषयी आवर्जून सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *