Menu Close

नाशिक जिल्ह्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’अंतर्गत कपडे वाटप आणि प्रवचने यांचे आयोजन

उपक्रमाचा लाभ घेतांना गरजू महिला

नाशिक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत जिल्ह्यात गरजूंना कपडे वाटप आणि ४ ठिकाणी प्रवचने यांचे आयोजन करण्यात आले. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रवचनांना साधारण ३०-४० धर्माभिमानी उपस्थित होते.

नगरसेविकांच्या उपस्थितीत गरीब आणि गरजूंना कपडे वाटप

येथील मखमलाबाद भागातील सुळेवाडी या आदिवासीबहुल भागामध्ये नगरसेविका सुनीता पिंगळे यांच्या उपस्थितीत २० हून अधिक गरीब आणि गरजू महिला यांना विनामूल्य साड्यांचे वाटप करण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण

येथील श्री साक्षात्कारी दत्त मंदिर येथील प्रवचनाच्या वेळी भाविकांनी स्वत: मंदिराची स्वच्छता करून बैठक व्यवस्था आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा यांची व्यवस्था केली होती, तसेच प्रवचनाच्या ठिकाणी लावण्यात येणार्‍या प्रदर्शनालाही साहाय्यता केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *