११ मंदिरांच्या स्वच्छतेत ३० धर्माभिमान्यांचा सहभाग
यवतमाळ : हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. त्यांचे पावित्र्य आणि मांगल्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांची स्वच्छता करण्यास सहकार्य करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे. येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत ११ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ३० धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. (राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील होणार्या ३० धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
यवतमाळ येथील दुर्गादेवी मंदिर, आठवडीबाजार जिनातील गणपति मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, मारुति मंदिर, तसेच वणी येथील राम मंदिर (पेटूर), दत्त मंदिर, श्री रंगनाथ स्वामी मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, माता मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माभिमान्यांचे श्री दत्तगुरूंकडे साकडे !
वणी येथील श्री दत्त मंदिराच्या स्वच्छतेनंतर श्री दत्तगुरूंना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी श्री दत्तगुरूंच्या भक्तांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता
यवतमाळ येथील स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गात येणार्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात