Menu Close

नागपूर येथील श्री सरस्वति मंदिर आणि श्री शीतलमाता मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

नागपूर : येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती सुषमा बत्रा यांनी प्रवचन घेतले. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांकडून श्री सरस्वतीदेवी आणि श्री शीतलमाता यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी’ साकडे घालण्यात आले.

क्षणचित्रे

प्रवचनाच्या वेळी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते. प्रवचनाला आलेले एक जिज्ञासू श्री. मूर्ती यांना ग्रंथ आवडल्याने त्यांनी त्यांच्या वाचनालयासाठी ९ हून अधिक ग्रंथ घेतले.

साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर झालेल्या प्रवचनांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *