Menu Close

अमरावती येथे विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी देवतांना सामूहिक गार्‍हाणे आणि प्रार्थना

श्री राधाकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्णचरणी सामूहिक प्रार्थना करतांना भक्तगण

अमरावती : येथील विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे अन् त्यांना दीर्घायुष्य लाभावे’, यांसाठी विविध भक्तगण आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून सामूहिक गार्‍हाणे अन् प्रार्थना करण्यात आली.

अ. काँग्रेसनगर येथील श्री अनादीशक्ती देवी मंदिर येथे सनातनच्या श्रीमती ज्योती खाडे आणि श्रीमती विजयकर यांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित श्री. गोस्वामी यांनी श्री गणेशाच्या चरणी गार्‍हाणे घातले.

आ. स्वस्तिकनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये सनातनचे श्री. सुहास भुमराळकर यांनी महाराजांच्या चरणी साकडे घातले.

इ. मच्छिसाथ येथील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये सनातनचे श्री. आणि सौ. गुल्हाने यांनी श्रीकृष्णचरणी १५ भक्तगणांच्या उपस्थितीत साकडे घालत सामूहिक प्रार्थना केली.

ई. सिकवाल पुरा येथील श्री गणपति मंदिरात श्री गणेशाच्या चरणी मंदिराच्या पुरोहितांनी विधीपूर्वक संकल्प करून त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या एका नवदांपत्याने साकडे घातले. या वेळी सनातनच्या सौ. गुल्हाने आणि १६ गणेशभक्त उपस्थित होते.

उ. आनंदनगर येथील श्री रामेश्‍वर मंदिरात सनातनचे श्री. आणि सौ. चिखलकर यांच्यासह अन्य भक्तांनी गार्‍हाणे घातले.

अनुभूती

  • देवाला गार्‍हाणे घालण्यासाठी संकल्पासाठी पाणी घेतल्यावर वस्तू ठेवल्याप्रमाणे जडपणा जाणवणे.
  • श्री रामेश्‍वर मंदिरात देवाला गार्‍हाणे घालण्यासाठी मी संकल्पासाठी हातावर पाणी घेतले. त्या वेळी काही क्षण हातावर वजनदार वस्तू ठेवल्यासारखा जडपणा जाणवला.

– श्री. आकाश चिखलकर, अमरावती

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *