राष्ट्रीय हिंदु आंदोलन !
देशद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची दादर येथे संतप्त निदर्शने
दादर, २३ मे (वार्ता.) – आतंकवादी संघटना म्हणून केंद्र शासनाने डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संस्थेची ‘इस्लामिक इंटरनॅशनल स्कूल’ ही अनधिकृत शाळा चालवण्यासाठी घेणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे एकप्रकारे देशद्रोह्याला पाठिंबा देत आहेत का, त्यांचे आतंकवाद्यांशी काही संबंध आहेत का, याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. यासह काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या धर्मांध युवकांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी २३ मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कबुतरखाना, दादर येथे संतप्त निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनामध्ये हिंदू गोवंश रक्षा समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी, हिंदू एकता जागृत समिती, हिंदु राष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, शिवपुत्र प्रतिष्ठान, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रारंभी श्री गणेशाला प्रार्थना करून आंदोलनाला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी आंदोलनाचा उद्देश सांगितला. या वेळी आंदोलकांनी देशद्रोह्यांना साहाय्य करणार्या अबू आझमी यांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
अबू आझमी यांच्या चौकशीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? हा पैसा चुकीच्या मार्गातून तर आलेला नाही ना, अशी शंका निर्माण होते. ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू आझमी, तत्सम व्यक्ती वा संस्था यांना चालवण्यासाठी देण्यात येऊ नये. तिचे हस्तांतरण झाले असल्यास ते रहित करण्यात यावे. शासनाने स्वतः ही शाळा वा ट्रस्ट कह्यात घ्यावा. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच हस्तांतरित करण्यात यावे. या प्रकरणात अबू आझमी यांच्या सखोल चौकशीसाठी आम्ही गृहखाते, विधीखाते आणि शिक्षण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करू.
या वेळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. प्रशासनाला द्यावयाच्या निवेदनांवर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षर्या केल्या.
आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. ब्रिजेश शुक्ला, शिवसेनेचे श्री. सुशीलकुमार वर्मा, शिवशंभू प्रतिष्ठानचे श्री. आशुतोष दळवी, विश्व हिंदु परिषदेचे प्रखंडप्रमुख श्री. विनय ठावरे, हिंदू एकता जागृत समितीचे श्री. राजू कदम, बजरंग दलाचे श्री. विमल मलिक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात