Menu Close

रोहा येथील श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साकडे

विदर्भासह नाशिक, मुंबई आणि रायगड येथील उपक्रमांत धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग !

साकडे घालतांना धर्माभिमानी

रोहा – येथील जागृत देवस्थान असणार्‍या श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृती स्वाथ्य निरोगी रहावे, यासाठी साकडे घातले. या वेळी सनातनचे साधक श्री. मनीष माळी यांनी साकडे घालण्याचे उद्देश सांगितला. यानंतर मंदिरात दर्शनाला आलेल्या ३० भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली.

मंदिरातील पुजारी श्री. वरणकर गुरुजींनी ‘सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करते, तर त्याच्यासाठी प्रार्थना करणे, ही आमच्यासाठी सेवाच आहे’, असे सांगितले.

क्षणचित्रे

या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी विभूती आणि प्रसाद देण्यात आला.

सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य असल्याचा मंदिराच्या विश्‍वस्तांचा विश्‍वास !

सनातन संस्थेच्या वतीने रोहा येथील रेल्वे स्थानकापासून जवळच असणारे श्रीराम मंदिर आणि मारुति मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य असल्याचे मंदिराच्या विश्‍वस्तांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *