सातारा : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी येथील अमरलक्ष्मी वसाहतीमधील महादेव मंदिरात आणि कर्मवीर नगर येथील पावन हनुमान मंदिरात साकडे घालण्यात आले, तसेच मंदिरांची स्वच्छताही करण्यात आली.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कमल कदम यांनी उपस्थित धर्माभिमान्यांंना संस्थेची ओळख, धर्माची सद्यस्थिती आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता, मंदिर स्वच्छतेचे महत्व यांविषयी मार्गदर्शन केले. शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
सौ. कमल कदम यांनी अमरलक्ष्मी येथील एका आस्थापनाच्या मालकांची भेट घेऊन त्यांना हिंदु राष्ट्र जागृती अभियानाविषयी माहिती सांगितली. त्यांनी लगेचच त्यांच्या आस्थापनातील १० कर्मचारी मंदिर स्वच्छतेेसाठी उपस्थित रहातील, असे सांगितले, तसेच पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वत:हून अर्पण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
सांगली येथे मंदिर स्वच्छतेतून मंदिराचे पावित्र्य जतन करण्याचा निर्धार !
सांगली : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले. विश्रामबाग येथील गृहनिर्माण नागराज सोसायटी येथील श्री दत्त मंदिर येथे स्वच्छता करण्यात आली. या वेळी सौ. सोनाबाई चव्हाण, सौ. केशर बोराडे, सौ. अंजली चिकुर्डे, सौ. गीता कुलकर्णी, सौ. अंजली ननवरे, सौ. ज्योती गोडबोले, श्रीमती आरती सामंत उपस्थित होत्या.
आळसंद (तालुका खानापूर) येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिराची महिलांनी स्वच्छता केली. या उपक्रमात सौ. सविता जाधव, अनुसया जाधव, आशा जाधव, भारती जाधव, जयश्री जाधव, अनिता वडगावे, पूजा जाधव, अंकिता जाधव, करुणा पाटील, पल्लवी जाधव, विमल जाधव, विठाबाई जाधव, अलका रोकडे यांनी सहभाग घेतला. सौ. वीणा कदम यांनी चैतन्याचा स्रोत असलेल्या मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी मंदिर स्वच्छतेचे महत्त्व उपस्थित महिलांना सांगितले.
हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हे ईश्वरी अधिष्ठानानेच पूर्णत्वास जाणार आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक कोणताही उपक्रम तसेच मोहीम भावपूर्ण करतात. आता समाजातूनही याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपाच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचकांच्या कृतीशील सहभागाने मंदिर स्वच्छता
वडगाव शेरी येथे धर्माभिमानी आणि मंदिराचे विश्वस्त यांनी एकत्रितरित्या केली मंदिर स्वच्छता
पुणे : जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे आणि वडगाव शेरी येथे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर स्वच्छता उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमातील वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे तळेगाव येथील मंदिर स्वच्छतेच्या उपक्रमात साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचकांनी, तर संस्थेच्या साधिकांच्या मुलांच्या मित्रांनी उत्स्फूर्तपणे कृतीशील सहभाग घेतला. याचसमवेत वडगाव शेरी येथे धर्माभिमानी आणि मंदिराचे विश्वस्त यांनी एकत्रितरित्या मंदिर स्वच्छता केली.
तळेगाव दाभाडे
१. येथील श्री तुळजाभवानी मंदिर, श्री दत्त मंदिर आणि श्री शिव मंदिर, इंदूरी येथे मंदिर स्वच्छता उपक्रम घेण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी लागणारे साहित्य येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. आणि सौ. प्रधान यांनी स्वतःहून उपलब्ध करून दिले. प्रत्यक्ष मंदिर स्वच्छतेच्या वेळी साप्ताहिकाचे आणखी एक वाचक श्री. प्रभाकर जगताप यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भावपूर्ण सेवा केली. श्री. जगताप यांनी ही सेवा झाल्यावर सांगितले, ‘‘खरेतर मंदिरामध्ये स्वच्छता राखणे, हे आमचे दायित्व आहे. त्यामध्ये सनातन संस्थेने पुढाकार घेतला. अशा प्रकारची सेवा अन्यत्र कोठेही असेल, तर जरूर सांगा. मी येईन.’’
२. सनातनचे कु. आेंकार काशीद आणि कु. अग्निवल्लभ साळोखे यांनी त्यांच्या मित्रांसह एकत्रितपणे आणि मनापासून पुढाकार घेत श्री शिव मंदिराची स्वच्छता केली.
क्षणचित्र
श्री तुळजाभवानी मंदिराची स्वच्छता केल्यानंतर स्थानिक रहिवासी असलेल्या महिलांनी सांगितले की, मंदिरामध्ये स्वच्छता राखणे, हे आमचे दायित्व असून तुम्ही ती केली.
वडगाव शेरी येथील मंदिर स्वच्छतेत विश्वस्तांचा सक्रिय सहभाग आणि त्यांनी मंदिर सात्त्विक झाल्याचे सांगणे
वडगाव शेरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या धर्मशिक्षण वर्गामध्ये येणारे धर्माभिमानी युवक आणि मंदिराचे विश्वस्त श्री. रमेश पवार यांनी एकत्रितरित्या येथील दिगंबरनगर भागातील श्री बल्लाळेश्वराच्या मंदिराची स्वच्छता केली. या उपक्रमानंतर श्री. पवार यांनी सांगितले की, आम्ही मंदिराची स्वच्छता करण्यासाठी वेतन देऊन एका व्यक्तीला चाकरीसाठी ठेवले आहे. त्या व्यक्तीकडूनही एवढी स्वच्छता केली जात नाही, तेवढी चांगली स्वच्छता समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. समितीच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण सेवा केली असून मंदिरातील वातावरण सात्त्विक झाले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
सोलापूर जिल्ह्यात मंदिर स्वच्छता आणि साकडे घालणे या उपक्रमांत मान्यवरांचा उल्लेखनीय सहभाग !
सोलापूर : येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या मंदिर स्वच्छता आणि साकडे घालणे या उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट येथील कालिकादेवी मंदिर आणि मल्लीकार्जुन मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली, तसेच देवतांना हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी अक्कलकोटच्या नगराध्यक्षा सौ. शोभा खेडगी, उपनगराध्यक्ष श्री. यशवंत धोंगडे, समता नगरचे सरपंच श्री. आनंद खजूरगीकर, माजी नगरसेविका ज्योती जरीपटके, धर्माभिमानी श्री. दीपक जरीपटके, श्री. रविंद्र किणगी, मंदिराचे पुजारी श्री. सिद्धेश्वर हिरेमठ, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. काही धर्माभिमानी ऐनवेळी उपक्रमात सहभागी झाले होते. प्रारंभी सौ. शोभा खेडगी यांनी भावपूर्ण वातावरणात श्री मल्लीकार्जुन देवाची पूजा आणि आरती केली. श्री. जरीपटके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बार्शी येथील कसबा पेठ तुकाईदेवी, माळेगल्ली येथील मारुति मंदिर तसेच कासारवाडी रस्त्यावरील अत्रिक ऋषी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात अनेक साधक आणि भक्त सहभागी झाले होते. जुळे सोलापूर येथील गणेश मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी श्री. पद्माकर वांगीकर, सौ. सुरेखा वांगीकर, श्रीमती इंदिरा नगरकर, सौ. अर्चना नकाते, सौ. मीना नकाते, सौ. मेघा जोशी, सौ. अनिता राठोड आदी उपस्थित होते. स्वच्छता पाहून तेथील पुजारी ‘तुमचा उपक्रम पुष्कळ छान असून, आमच्या पुजारी मावशींनाही साहाय्यासाठी पाठवतो,’ असे म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात