अक्कलकोट : येथील आझाद गल्ली, भारत गल्ली आणि ए-वन चौक या भागांमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे एकमेवाद्वितीय कार्य’ आणि ‘हिंदू राष्ट्र का हवे ?’ या विषयांवर सौ. लतिका पैलवान यांनी मार्गदर्शन केले. याचा एकूण ९१ जिज्ञासूंनी लाभ घेतला. सर्वांनी प्रतिदिन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्याचा तसेच साधना करण्याचा निश्चय केला. येथील अनेक जण मंदिर स्वच्छतेतही सहभागी झाले होते.
मुख्याध्यापिकांची शाळेत प्रवचन घेण्याची मागणी
प्रवचन चालू असतांना जवळच असलेल्या वागदरी शाळेच्या मुख्याध्यापिका विषय ऐकून प्रभावित झाल्या. त्यांनी ९ ऑगस्ट या दिवशी क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखा’ या विषयावर प्रवचन घेण्याची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे मागणी केली. त्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित फलक प्रदर्शन लावण्याची मागणीही केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात