Menu Close

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अवघे देवतांच्या चरणी लीन झाले ।।

श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे घालतांना डावीकडून श्री. सुधीर धोंगडे, श्री. लेले आणि उपस्थित वारकरी

तळेगाव दाभाडे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’अंतर्गत येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यांसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी मंदिराचे पुजारी श्री. अतुल देशपांडे यांनी श्रीफळ अर्पण करून साकडे घातले. १७ मे या दिवशी घातलेल्या साकड्याच्या वेळी सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. सुधीर धोंगडे, श्री. नरसिंह लेले, अन्य हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी उपस्थित होते. या साकड्यानंतर उपस्थितांनी श्री विठ्ठलाची आरती केली.

पिंपरी वाघेरे (पुणे) येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये भक्तांकडून साकडे

श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घालतांना देवीचे भक्त

पुणे : येथील पिंपरी वाघेरे गावातील धर्माभिमानी श्री. संदीप वाघेरे यांनी बांधलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये नरेंद्र महाराज संप्रदायाचे भक्त आणि अन्य देवीभक्त अशा १६ जणांनी देवीच्या चरणी २१ मे या दिवशी सायंकाळी पूजेनंतर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घातले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *