इंदूर (निजामाबाद) येथे माहिती अधिकार कार्यशाळा
इंदूर (निजामाबाद) : परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या कार्यशाळेला इंदूर येथील ज्येष्ठ अधिवक्ता कृष्णानंद चारी, हैद्राबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता गंगाधर गौड, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी संबोधित केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. पसुलेट्टी गोपीकिशन यांनी पुढाकार घेतला. या कार्यशाळेचा लाभ ७० हून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला.
क्षणचित्रे
१. कार्यशाळेच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.
२. सर्व धर्माभिमान्यांनी कायदेविषयक प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले, तसेच गट चर्चेलाही चांगला प्रतिसाद दिला.
इंदूर (निजामाबाद) येथे प्रवचन
इंदूर (निजामाबाद) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सुभाषनगरमध्ये एका धर्माभिमान्यांच्या निवासस्थानी साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयांवर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या सौ. नीला लावण्य यांनी मार्गदर्शन केले.
भाग्यनगर (हैद्राबाद) येथे प्रवचन
भाग्यनगर (हैद्राबाद) : येथे ओल्ड अलवल भागात साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयांवर प्रवचन घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याला ३० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. स्थानिक धर्माभिमानी श्री. नवीन चंदर यांनी या प्रवचनाचे आयोजन केले.
तेलंगणमध्ये इतर उपक्रमांचे आयोजन
करीमनगर, भाग्यनगर आणि इंदूर येथील विविध ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त मोठे फलक लावण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात