Menu Close

धर्माभिमान्यांना संघटित करणारी हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील हिंदु एकता फेरी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

धारवाड कर्नाटक येथील दिंडीत सहभागी झालेले श्री प्रमोद मुतालिक आणि अन्य धर्माभिमानी

हिंदूंवर आलेली संकटे दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

हुब्बळ्ळी (कर्नाटक) : शहरात हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हे प्रत्येक हिंदु संघटनेचे ध्येय बनले आहे. तेच श्रीराम सेनेचेही ध्येय आहे. प.पू. डॉ. जयंत आठवले हे माझे गुरु आहेत. त्यांच्या कृपेनेच कार्य चालू आहे. बाहेर भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, हिंदूंवर येणारी संकटे यामध्ये वाढ झाली आहे. हे सर्व दूर होण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत २१५ पेक्षा अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, रणरागिणी आणि बालसाधक यांचे पथक ठरले दिंडीचे आकर्षण !

हिंदु राजे आणि वीरांगना यांच्या पेहरावात बालसाधक !
डोक्यावर कलश घेऊन दिंडीत सहभागी झालेल्या महिला मंडळातील सदस्या

दिंडीच्या वेळी लाठी-दंडसाखळीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. रणरागिणी शाखेचे पथक, हिंदु राजे आणि विरांगना यांची वेशभूषा परिधान केलेले बालसाधक हे दिंडीचे खास आकर्षण ठरले.

दिंडीत सहभागी संघटना

अय्यप्पा भक्त वृंद, शिवाजी फाऊंडेशन, स्वामी विवेकानंद संघटना, पर्ल लेआऊट महिला मंडळ आणि श्री दुर्गामाता महिला मंडळ

उपस्थित मान्यवर

प्रवचनकार श्री. समीर आचार्य, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद, एस्.एस्.के. कोऑपरेटीव बँक तसेच मैत्री मंडळ यांच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला बदी, सिंडिकेट बँकेचे सदस्य श्री. शांतण्णा कडिवाळ

क्षणचित्र

एक पोलीस दिंडी पहात होते. त्या वेळी त्यांनी साधकांना उद्देशून, तुम्ही पुष्कळ उत्तम कार्यक्रम करत आहात, असे सांगितले.

शहरातील आजूबाजूच्या परिसरातील धर्माभिमानी हिंदूंचाही सहभाग

हुब्बळ्ळी शहराच्या जवळ असलेल्या हळियाळ गावातील धर्माभिमानी दिंडीत सहभागी झाले. शिग्लीहून आलेेलेे १० धर्माभिमानी ही दिंडीत सहभागी झाले होते.

समाजाकडूनही दिंडीसाठी साहाय्य !

१. दिंडीनंतर सभा घेण्यासाठी वाहनतळाच्या ठिकाणी जागेची आवश्यकता होती. या वाहनतळाचा अध्यक्ष अन्य धर्मीय होता. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेतली आणि त्याला वाहनतळावरील जागेविषयी विचारल्यावर त्याने समितीच्या कार्यकर्त्यांना जागा उपलब्ध करून द्या, असे कार्यकर्त्यांना सांगितले आणि व्यासपिठाला जागा उपलब्ध करून दिली.

२. साई गोल्डस्मिथच्या मालकांची समिती कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती सांगितल्यावर तसेच त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दिंडीविषयी सांगताच त्यांनी व्यासपिठाच्या सिद्धतेसाठी लागणारे शामियाना आणि मंडप मी स्वतः उभारून देतो, असे सांगितले.

३. दिंडीसाठी काही फलकांना लाकडी फ्रेम बसवणे आवश्यक होते. त्याविषयी अशी कामे करणार्‍या व्यक्तीची समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली असता त्यांनी फलकांना निःशुल्क फ्रेम घालून देतो, असे सांगितले.

४. शहरातील दुर्गादेवी मंदिराच्या ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन करण्याचे ठरले. त्यासाठी मंदिराच्या विश्‍वस्तांकडे ध्वजपूजेसाठी अनुमती विचारण्यास समितीचे कार्यकर्ते गेले असता विश्‍वस्तांनी त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. देवस्थानाच्या बाहेर समितीचा फलक लावा आणि तो सर्वांना दिसेल, असा लावा, असेही त्यांनी सांगितले.

शेवटी दिंडीचे सभेत रूपांतर झाले, तो क्षण ! त्या वेळी उपस्थित धर्माभिमानी

धर्माभिमान्यांचा फेरीत उत्स्फूर्त सहभाग !

१. एका धर्माभिमान्याने दिंडीसाठी स्वतः पैसे भरून नगरपालिकेची अनुमती आणली.

२. एका धर्माभिमान्याला हिंदू एकता अभियानाविषयी समजताच त्यांनी दिंडीला लागणारे ध्वज तसेच काठ्या निःशुल्क उपलब्ध करून दिल्या.

३. दिंडीसाठी आवश्यक सामानाची ने-आण करण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती. त्याविषयी एका धर्माभिमान्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाविषयी, तसेच त्यानिमित्ताने काढण्यात येणार्‍या दिंडीविषयी सांगितल्यावर त्यांनी तत्परतेने वाहन उपलब्ध करून दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *