इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना पाकमधून नव्हे, तर इराणमधून अटक करण्यात आली होती, अशी स्वीकृती पाकची गुप्तहेर संस्था आयएस्आयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेल्या अमजद शोएब यांनी दिली आहे. शोएब यांच्या या वक्तव्यामुळे जाधव यांना पाकमध्ये अटक केल्याचा पाकचा दावा खोटा ठरला आहे. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पुढील सुनावणीत भारताला अमजद शोएब यांच्या विधानाचा वापर करता येऊ शकेल. भारतानेही जाधव यांना इराणमधून अपहरण करून पाकमध्ये नेल्याचे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात