Menu Close

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला अखेर टाळे !

हिंदु संतांवर संघटितपणे एकाच वेळी अकारण चिखलफेक करणार्‍या वृत्तवाहिन्या याविषयी चर्चासत्रे का आयोजित करत नाहीत ?

घरवापसीविषयी जिवाच्या आकांताने हिंदु संघटनांवर टीका करणारे काँग्रेसवाले, धर्मनिरपेक्षवाले, पुरोगामी ख्रिस्त्यांच्या या धर्मांतराविषयी आणि अंधश्रद्धेविषयी गप्प का ? यातून त्यांची बेगडी धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्व दिसून येते ! 

वसई : आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या ८ वर्षांपासून वसईमध्ये गरीब आणि भोळ्या हिंदूंना आजार बरे करण्याच्या नावाखाली फसवून सॅबेस्टिअन मार्टिन त्यांचे धर्मांतर करत आहेत.

एका वाहिनीने या वृत्ताचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी अखेर ही कारवाई केली आहे. विष्णु कुडवे हे आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे व्यवस्थापक आहेत. विष्णु कुडवे आणि वैभव तरे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ३१ जानेवारीला पोलिसांनी ही कारवाई केली.

सॅबेस्टिअन मार्टिन किडनीचे विकार, गुडघेदुखी, मधुमेह हात लावताच बरे होतील, असे रुग्णांना सांगतात. संमोहनाद्वारे त्यांना व्यासपिठावर आडवे पाडून नंतर ते बरे झाल्याचा दावा करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *