भारी : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने गावातील श्रीराम मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेला उपस्थित १२५ हून अधिक धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटीत होण्याची प्रतिज्ञा केली. या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल आणि सनातन संस्थेच्या कु. माधवी चोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सभेच्या प्रारंभी शंखनाद करून वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख समितीचे श्री. प्रफुल टोंगे यांनी करून दिली. या सभेमध्ये कु. माधवी चोरे यांनी ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापण्याविषयीचे विचार’ मांडतांना ‘संतांनी सांगितल्यानुसार हिंदु राष्ट्र स्थापन होणारच’ असल्याचे सांगितले. तसेच श्री. मंगेश खांदेल यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर बोलतांना ‘देशामध्ये विस्थापित म्हणून रहाणार्या काश्मिरी हिंदूंना शासन केवळ पुनर्वसनाचे आश्वासन देते, हे अत्यंत संतापजनक असल्याचे’ प्रतिपादीत केले. सभेच्या शेवटी सनातनच्या सौ. सुनीता खाडे यांनी उपस्थित धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठीची प्रतिज्ञा सांगितली. सभेचे सूत्रसंचालन समितीच्या कु. तन्वी खाडे यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात