नागपूर : येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यानंतर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेमध्ये सनातनच्या सौ. मंगला पागनीस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदशन केले. या सभेला उपस्थित ग्रामस्थांनी सभेनंतर सनातन-निर्मित ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद दिला.
नागपूरमधील सुरभी प्रशिक्षण केंद्र येथे प्रवचनांचे आयोजन
नागपूर : येथील देवनगर भागातील सुरभी प्रशिक्षण केंद्रामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने २ प्रवचनांचे आयोजन केले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याची माहिती’, तर सनातनच्या सौ. मंगला पागनीस यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा ३३ धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. उपस्थित अनेक धर्माभिमान्यांनी साधनाविषयक सूत्रे लिहून घेतली.
२. कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक श्री. बाबा भेंडे यांनी सांगितले की, ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा विषय आम्ही नक्कीच पुढे आमच्या २ केंद्रांत घेण्यास अनुमती देऊ आणि येथून पुढेही असे विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना बोलवू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
धुळे येथे धर्माभिमान्यांकडून मंदिराची स्वच्छता आणि प्रवचनाचा प्रसार
धुळे : येथील श्री सोन्यामारुति मंदिरात स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक मंदिर स्वच्छता केली, तसेच प्रवचनाचाही प्रसार केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रवचन घेतले.
नंदुरबार येथील मंदिर स्वच्छतेमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
नंदुरबार : येथील श्री कामनाथ महादेव मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी कामनाथ महादेव ग्रुपचे युवक ‘क्रिकेट’चा खेळ सोडून सहभागी झाले. मंदिर स्वच्छतेनंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर ‘मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर विवेचन करण्यात आले. स्वच्छतेसाठी सर्वश्री विशाल चित्ते, प्रसाद साळवे, ओम चित्ते, ऋग्वेद शिंदे, हिंमाशू सोनार, हर्ष चित्ते, आयुष पाटील, क्रीश जव्हेरी, मीत जव्हेरी, यश पवार, तेजस सोनार आणि कु. अर्चना पाटील यांनी सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात