Menu Close

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन

घाटकोपर (मुंबई) येथे युवा शौर्य जागरण शिबीर

मुंबई : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर मधील बर्वेनगर येथील शाळा क्र. २ च्या मैदानात युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले होते. शिबिराचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी शिबिरार्थींना लाठीकाठीचे प्रकार दाखवून त्यांच्याकडून ते करवून घेतले. शिबिराच्या अखेरीस उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली. श्री. विवेक सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हिंदूंनो, पराक्रम गाजवण्यासाठी सिद्ध व्हा !

हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले. आपणही त्यांचा आदर्श ठेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करायला पाहिजेत, जेणेकरून आपली भावी पिढी आपला आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आचरण करेल. आहिंसावादाच्या लाटेने हिंदूंना मानसिकदृष्ट्या दुर्बल बनवले. त्यामुळे हिंदू आपले मूळ स्वरूप विसरला आहे. आज पुन्हा त्या शौर्याचा जागर करण्याची वेळ आली आहे. श्री. अभय वर्तक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भ्रष्टाचार्‍यांची आणि फसवणूक करणार्‍यांची सूची करणे, माहिती अधिकाराचा वापर करणे यांविषयी सांगितले.

क्षणचित्रे

१. शिबीर समाप्त होण्यास रात्रीचे ११ वाजूनही शिबिरार्थींमध्ये उत्साह टिकून होता.

२. समारोपानंतर उपस्थितांनी श्री. अभय वर्तक यांच्याकडून शंकानिरसन करून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *