फिलीपीन्समध्ये इसिस समर्थकांच्या हिंसाचारामुळे २१ जण ठार
भारतातील एकातरी शासनकर्त्याने आतंकवाद्यांच्या विरोधात असे विधान कधी केले आहे का ? दुसरा सिरीया बनू पहात असलेल्या फिलीपीन्ससारखी स्थिती पुढे भारतात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मनिला : फिलीपीन्समध्ये इसिस समर्थक आतंकवाद्यांच्या हिंसाचारामुळे २१ जण ठार झाले आहेत. यामुळे येथील मिंडनाओ प्रांतात ६० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. फिलीपीन्स रोमन कॅथलिक देश आहे.
१. आतंकवाद्यांनी मुसलमानबहुल मिंडनाओ प्रांतातील मारावी शहरात एका पोलीस प्रमुखाचा शिरच्छेद केला. तसेच काही इमारतींना आग लावण्यात आली. तसेच एका चर्चच्या पाद्य्राला आणि चर्चमधील काही जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. हे आतंकवादी हातात इसिसचा झेंडा घेऊन फिरत आहेत. त्यांनी सर्वत्र इसिसचे झेंडे लावले आहेत.
२. राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते रशियाच्या दौर्यावर होते. त्यांना या हिंसाचाराची माहिती मिळताच ते देशात परतले.
दुतेर्ते यांनी इसिसच्या समर्थकांना चेतावणी देतांना म्हटले की, जर तुम्हाला मरायचे असेल, तर तुम्हाला आम्ही ठार करूच. तुम्ही आमच्याशी युद्ध केले, तर तुम्ही ठार व्हाल आणि त्याला माझी कोणतीच अडचण नसेल आणि तसेच होईल.
येथील हिंसाचार २३ मे पासून चालू झाला आहे. अबू सयाफ नावाच्या आतंकवादी संघटनेकडून हा हिंसाचार करण्यात येत आहे. ही संघटना स्वतःला इसिसचा भाग असल्याचे सांगते. हिचा प्रमुख कमांडर इसनिलोन हापिलोन आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमेरिकेनेही त्याच्या नावावर ३२ कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात