Menu Close

(म्हणे) भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करणार !

तमिळनाडू तौहीद जमात संघटनेचे फुत्कार !

देशात असहिष्णुता वाढत असल्याची ओरड करणारे आता कुठे गेले ? धर्मांधांचा उघड हैदोस म्हणजे सहिष्णुता आणि हिंदूंची न्याय्य मागणीसाठीची चळवळ म्हणजे असहिष्णुता, असे समीकरण आहे कि काय ?  

चेन्नई : तमिळनाडू तौहीद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे ३१ जानेवारीला एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (म्हणजे मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित या कार्यक्रमाला लाखो धर्मांध उपस्थित होते. या कार्यक्रमात भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करण्याची जिहादी घोषणाही करण्यात आली.

१. कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनेने मूर्तीपूजा, ज्योतिषशास्त्र, योग आणि हिंदूंच्या धार्मिक कृत्यांना इस्लामविरोधी मानून त्यांचा अंत करण्याची शपथ घेतली.

२. दर्ग्यात प्रार्थना करण्याच्या कृतीलाही इस्लामविरोधी मानून त्याला इस्लाममध्ये स्थान नसल्याचे घोषित करण्यात आले.

३. यामुळे दुखावलेल्या कोइम्बत्तूरच्या सुन्नत जमात फेडरेशनने आयोजकांच्या विरोधात तत्परतेने याचिका दाखल केली. (किती हिंदूंनी या कार्यक्रमाला विरोध केला ? – संपादक , दैनिक सनातन प्रभात )

४. कार्यक्रमाच्या माध्यमातून तमिळनाडू तौहीद जमातने तमिळनाडूला केंद्रस्थानी मानून भारतभरात शरीया कायदा लागू करण्याचा निश्‍चयही केला.

५. योग्य इस्लामच्या नावाखाली शरीया, हलाल आणि तौहीद (अल्लाशी एकरूपता)ची अंमलबजावणी करण्याचा निश्‍चयही या वेळी करण्यात आला. (देशात असहिष्णुता वाढल्याची बांग ठोकणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साहित्यिक आता का गप्प बसले आहेत ? हिंदूंनो, अशा ढोंगी मंडळींना वैध मार्गाने खडसवा ! – संपादक , दैनिक सनातन प्रभात )

कार्यक्रमाला विरोध करणार्‍या हिंदू मक्कल कत्छीच्या अनेक कार्यकर्त्यांना हिंदुद्वेषी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक अटक !

१. तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छीने (हिंदू जनता पक्षाने) या कार्यक्रमाला आधीच विरोध दर्शवला होता.

२. चेन्नई, तिरुचिरापल्ली आणि राज्यातील अन्य काही शहरांमध्ये संघटनेने आंदोलने केली होती.

३. संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री जयललिता आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना पत्र लिहून सदर कार्यक्रम रहित करण्याची मागणीही केली होती; परंतु या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. (बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येणे, हे हिंदूंसाठी हानीकारकच ! ही स्थिती पालटण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक , दैनिक सनातन प्रभात )

४. हिंदुद्वेषी कार्यक्रमाला विरोध करणार्‍या हिंदू मक्कल कत्छीच्या अनेक धर्माभिमानी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाआधी पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली होती. (हिंदूंनो, हिंदुद्वेषी तमिळनाडू पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक , दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *