फलक कापून किंवा ते चोरून त्यांची विटंबना करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी खर्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये राष्ट्र-धर्म जागृती होत असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना होईलच, हे हिंदुद्रोह्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सनातनच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे तेजस्वी विचार असलेला ६ x ४ फूट या आकारात फलक एका परिसरात लावला होता. या फलकावरील विचार समाजापर्यंत पोहोचू नयेत, या हेतूने काही हिंदुद्रेह्यांनी फलकाचा मध्यभाग कापून काढला आहे.
उरण येथे अन्य एका ठिकाणी लावलेले २ फलक समाजकंटकांनी चोरले, तर एका ठिकाणी लावलेला फलक काढून तेथील एका विवाहसोहळ्याचा फलक तेथे लावला. पेण तालुक्यातूनही ३ फलकांची चोरी झाली, तर धोकवडे या गावात एका फलकाला ब्लेडने कापण्यात आले, तर एका फलकाची चोरी झाली आणि एक फलक फाडण्यात आला.
विरोध होऊनही हिंदु राष्ट्र जागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलकांच्या संदर्भात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विटंबना झालेली असली, तरी रायगड जिल्ह्यात फलकांच्या अभियानाला ईश्वरी कृपेने हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात