Menu Close

श्रीलंकेतील महापुरात ११९ जणांचा मृत्यू तर १५० बेपत्ता

कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या महापुरात आतापर्यंत ११९ जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. २००३ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारताने तत्परतेने श्रीलंकेला मदत पाठवत नौदलाचे तीन जहाज रवाना केले आहेत. भारताने पाठवलेली मेडिकल आणि आपातकालीन टीम श्रीलंकेत पोहोचली आहे. भारताने पाठवलेले ‘किर्च’ शनिवारी कोलंबोत दाखल झाले. या जहाजातून औषध साहित्य पाठवण्यात आले आहे.

देशातील २० हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. गुरुवार व शुक्रवार मिळून देशात ३०० ते ५०० मिमी पाऊस झाला. काही भागात तर ६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करत आहेत. २००३ मध्ये पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात २५० नागरिकांचा बळी घेतला होता.

बचावकार्यादरम्यान श्रीलंका नौदलाच्या एका जवानाचा हेलिकॉप्टरमधून पडून मृत्यू झाला. परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *