Menu Close

वीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी चुकीची माहिती देणार्‍यांवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत : वसई-विरार मराठा समाजाची मागणी

आयसीएस्ई बोर्डाचा इतिहासद्रोह ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पालघर : आयसीएस्ई बोर्डाच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातून वीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी चुकीची माहिती देणार्‍यांवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वसई तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे वसई-विरार मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. (अशी मागणी करावी लागणे दुर्दैवी ! याविषयी इतिहासप्रेमींना काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

निवेदनात म्हटले आहे की,

१. पुस्तकात कोंढाणा गड जिंकणार्‍या तानाजी मालुसरे यांचे नाव सिंह असल्यामुळे गडाचे सिंहगड असे नामकरण करण्यात आले, असा उल्लेख आहे.

२. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पालटण्यात येऊ नये. असा प्रयत्न कुणी करत असेल, तर तो हाणून पाडायला हवा. भविष्यात असे होऊ नये, यासाठी वचक निर्माण करावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *