पुणे : काश्मीरमधील फुटीरतावादी आणि धर्मांध नागरिक यांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक करणे, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे हे प्रकार निधर्मीवादाचे दुष्परिणाम आहेत. सैनिकांकडे बंदुका असतांना होणारी मारहाण म्हणजे देशाचे अपयश आहे. सैनिक बंदुकीचा वापर करू शकत नाहीत आणि शासनही आपल्यावर कारवाई करणार नाही, याची धर्मांधांना निश्चिती असते. त्यामुळेच सैनिकांच्या विरोधात धर्मांध आणि फुटीरतावादी यांचे फावते. शासन सैनिकांना बंदूक वापरण्याचे आणि अन्य अधिकार देत नसल्याने त्यांचे मनोबल खच्ची होत आहे. त्यामुळे सैनिकांना विशेषाधिकार देण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने सैन्यावर दगडफेक करणार्या देशद्रोही आणि धर्मांध यांना भारताबाहेर हाकलून लावले पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केली. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर २६ मे या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनामध्ये लाल महाल उत्सव समितीचे श्री. चंद्रशेखर शिंदे, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे यांसह ९० हून अधिक धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
श्री. तागडे पुढे म्हणाले की, मशिदींवर लावण्यात आलेल्या अवैध भोंग्यावरून देण्यात येणार्या अजानप्रकरणी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. ज्याप्रमाणे पोलीस गणेशोत्सवाच्या वेळी गणेश मंडळांना कायद्याचे पालन करायला लावतात, त्याप्रमाणे पोलिसांनी मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करावी.
धर्मांतराला प्रवृत्त करणारा तेलंगणा शासनाचा निर्णय रहित करा ! – श्री. शंभू गवारे
तेलंगणा स्टेट ख्रिश्चन (अल्पसंख्यांक) फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने आरंभलेल्या योजनेत १० लक्ष रुपयांच्या आतील प्रकल्पासाठी अनुदान मिळण्यासाठी पात्रता अटींमध्ये पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी ही ठेवली आहे. ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा दाखलाही जोडायला हवा, अशाही अटी आहेत. यामुळे गरीब हिंदूंना शासकीय सुविधा मिळत नसल्याचा संदेश जनतेमध्ये जाईल. त्यामुळे हिंदूंमध्ये अन्यायाची भावना वाढीस लागून अनुदान मिळवण्यासाठी धर्मांतर करून ख्रिस्ती होण्याचे प्रकार चालू होतील. तेलंगणा शासनाने अशा सवलती देणे, हा निधर्मी शासनाचा अवमान आणि राज्यघटनेची पायमल्ली आहे. एकप्रकारे ही मनमानी असून ती रोखली जावी, ही आमची मागणी आहे. तसेच शासकीय स्तरावर धर्मांतरास प्रोत्साहन दिला जाणारा तेलंगणा स्टेट ख्रिश्चन फायनान्स कार्पोरेशनचा निर्णय रहित करावा.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
१. श्री. संदीप होडे – हे आंदोलन योग्य असून हिंदु धर्म रक्षणासाठी आवश्यक आहे.
२. श्री. दत्तात्रय घोलप – देशद्रोह्यांनी दगड मारले, तर शासन काय करत आहे ? देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. (जे सर्वसामान्यांच्या लक्षात येते, ते शासनाच्या लक्षात का येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. एका पोलिसाने सांगितले की, देश विदारक स्थितीत असतांना आपण धर्मांध आणि आतंकवादी यांचा प्रतिकार कसा करणार ? हिंदूंसाठी एकही लोकप्रतिनिधी या देशात नाही. हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे. (जे एका पोलिसाला कळते, ते शासनाला का कळत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
क्षणचित्रे
१. अनेक नागरिक आंदोलनाचा विषय ऐकत होते, कुतुहलाने पहात होते आणि घोषणाही देत होते.
२. श्री. पवन पाटील याने काही काळ थांबून घोषणा दिल्या आणि तेथून जातांना उपस्थित एका कार्यकर्त्याला सांगितले की, मीही तुमच्या आंदोलनात सहभागी आहे.
३. एक मुसलमान व्यक्ती आंदोलनाच्या समोरच्या बाजूला थांबून आंदोलनातील विषय लक्षपूर्वक ऐकत होता.
४. कु. ज्ञानोबा आझोरे, कु. नारायण मुळे, कु. दीपक तुपे-पाटील या शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः थांबून विषय जाणून घेतला आणि निवेदनांवर स्वाक्षर्या केल्या.
५. या आंदोलनाला साध्या वेशातील ५ आणि पोलीस वेशातील ४ पोलीस बंदोबस्ताला होते. (पोलिसांनी हाच वेळ आतंकवाद्यांची स्थाने शोधण्यासाठी दिला असता, तर अधिक योग्य झाले असते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. व्हॉटस् अॅपवरील संदेश पाहून श्री. कृष्णा घाडी हे धर्माभिमानी ३६ किलोमीटरवरून आंदोलनाला आले.
फेसबूकवरून थेट प्रक्षेपण
या आंदोलनाचे फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. ते ५०९ जणांनी पाहिले. तसेच आंदोलनाची ध्वनीचित्रफीत २ सहस्रांहून अधिक जणांपर्यंत पोहोचली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात