Menu Close

इसिसच्या नावे आयुक्तांना धमकी

सोलापूर : शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.

हाताने लिहिलेले हे पत्र महापालिकेला दोन दिवसांपूर्वी यांनी मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन ते पत्र पोलिसांकडे दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये सप्टेंबर २००९ नंतरची धार्मिक स्थळे हटविण्याची नोटीस देण्यात आली आहे. यातील पाच धार्मिक स्थळे हटविण्याला आक्षेप घेत हे पत्र लिहिले आहे. पत्रात आयुक्त काळम, यांच्याबरोबर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही लक्ष करण्यात आले असून, एके रायफल, हॅन्डग्रेनेडने उत्तर देण्याची भाषा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

संदर्भ : दैनिक लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *