Menu Close

महिला बसवाहकाचा विनयभंग केल्याप्रकरणी धर्मांध दलालावर गुन्हा प्रविष्ट

वासनांध धर्मांध ! अशांना कठोर शिक्षाच करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संभाजीनगर : येथील मध्यवर्ती बसस्थानकात २४ मे या दिवशी एका खाजगी ट्रॅव्हल्सचा दलाल धर्मांध जाकेर मेहबूब खान याने महिला वाहकाचा विनयभंग केला, तर त्याच्या सहकाऱ्यांनी अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ बसस्थानक परिसरात कर्मचाऱ्यांनी काही काळ ‘काम बंद’ आंदोलन केले. याप्रकरणी जाकेर मेहबूब खान याच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

१. मध्यवर्ती बसस्थानकातील महिला वाहकाच्या लेखणीतील शाई संपली, म्हणून त्या लेखणी आणण्यासाठी बसस्थानकाबाहेर जात होत्या. त्या वेळी खान याने एक वाक्य उच्चारत त्यांचा हात पकडला.

२. महिला वाहकाने विरोध करताच खानसह असलेल्या आणखी २ दलालांनी शिवीगाळ केली. त्यातून बसस्थानक आगारात राज्य परिवहनचे कर्मचारी आणि दलाल यांच्यात वादावादी होऊन मारहाण झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *