मंगळुरू येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची मागणी
मंगळुरू (कर्नाटक) : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे, काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्या धर्मांध युवकांवर कडक कारवाई करावी आणि त्यांना समर्थन देणार्यांनाही शिक्षा करावी, तसेच तेलंगणमध्ये केवळ ख्रिस्ती लोकांना अनुदान देणारी ‘तेलंगण स्टेट ख्रिश्चियन फायनान्स कॉर्पोरेशन’ योजना रहित करावी, यांसाठी धर्माभिमानी हिंदूंनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
काश्मीरमध्ये सैन्याला सर्वाधिकार देण्यात यावे ! – धर्माभिमान्यांची मागणी
शिवमोग्गा (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
शिवमोग्गा(कर्नाटक) : काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे आणि तेलंगणमध्ये केवळ ख्रिस्ती लोकांना अनुदान देणारी ‘तेलंगण स्टेट ख्रिश्चियन फायनन्स कार्पोरेशन’ योजना रहित करावी या मागण्यांसाठी धर्माभिमानी हिंदूंनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या आंदोलनाला या वेळी शिवमोग्गा जिल्हा क्षत्रिय मराठा समाजाचे श्री. दिनेश चौहान, परिसर वेदिकेचे श्री.रमेश, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर यांसह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात