कुठे एक आतंकवादी आक्रमण झाल्यावर तात्काळ इसिसवर बॉम्बचा मारा करणारा ब्रिटन, तर कुठे ३ दशके आक्रमणे होत असतांनाही मृतवत रहाणारे भारतीय शासनकर्ते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लंडन : ब्रिटनच्या मँचेस्टर एरिना येथे झालेल्या आत्मघातकी आक्रमणाचा सूड म्हणून ब्रिटीश सरकारने सिरीयातील इसिसच्या तळांवर बॉम्बफेक चालू केली आहे. ब्रिटनच्या वायूदलाच्या विमानांनी ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश लिहिलेले बॉम्ब इसिसवर टाकण्यात आले आहेत. या बॉम्बची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून (सोशल मीडियावरून) सर्वत्र प्रसारित होत आहेत. यामध्ये ब्रिटीश जेट पेववे बॉम्ब घेऊन जातांना दिसत आहेत. या बॉम्बवर ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश दिसत आहे. ब्रिटनच्या वायूदलाच्या प्रवक्त्यांनी ही छायाचित्रे खरी असल्याचे म्हटले आहे.
बॉम्बवर लिहिलेल्या संदेशामागील भावना समजून घेण्यासारख्या आहेत. अशा प्रकारचे संदेश लिहिणे, हा ब्रिटीश वायूदलाचा इतिहास आहे, अशी माहिती एका अधिकार्याने दिली आहे.
मागील आठवड्यात करण्यात आलेल्या मँचेस्टर एरिनातील आक्रमणात २२ लोकांचा मृत्यू झाला होता. या आक्रमणाचे दायित्व इसिसने घेतले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात