Menu Close

मुझफ्फरनगर कारागृहातील ३२ हिंदु कैदी रोजा पाळत आहेत

एकतरी मुसलमान कैदी कारागृहात हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी उपवास करतो का ? धर्मशिक्षणाच्या अभावी रोजा पाळणार्‍या हिंदूंना पुरो(अधो)गामी ‘निधर्मीवादी’च म्हणणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेले ३२ हिंदु कैदी १ सहस्र १७४ मुसलमान कैद्यांसोबत रमझान मासातील रोजा पाळत आहेत. कारागृहाचे अधीक्षक राकेश सिंह यांनी रोजा पाळणार्‍या सर्व कैद्यांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना रोजा सोडतांना इफ्तार करण्यासाठी दूध आणि सुका मेवा देण्यात येत आहे. (दिवाळी आणि अन्य सणांच्या वेळी हिंदूंना अशा सोयी दिल्या जातात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *