शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणाऱ्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये – पंकजा मुंडे
पुरो(अधो)गामी महिला पंकजा मुंडे यांच्याकडून काही शिकतील का ?
मुंबई – महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी ? हा विषय आपसात मिटवावा, असे वक्तव्य राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी ३१ जानेवारी या दिवशी माध्यमांशी बोलतांना केले. सावता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या वेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
जलसिंचन प्रकल्पातील घोटाल्याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, जलसिंचनासाठी सात सहस्र कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला; मात्र एकही धरण झाले नाही. या भ्रष्टाचारातून काही लोकांची घरे मात्र भरली.
स्त्रोत : लोकसत्ता