गोवंडी (मुंबई) येथे माहिती अधिकार कार्यशाळा
मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ मे या दिवशी गोवंडी येथे माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वसंत बनसोडे, अधिवक्ता धर्मराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये अधिवक्त्यांसह १८ जण सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित वक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे उपस्थितांना आवाहन केले.
शिबिरामध्ये अधिवक्ता धर्मराज यांनी माहिती अधिकाराचे महत्त्व आणि त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा ? माहिती अधिकाराचा वापर करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अधिवक्ता वसंत बनसोडे यांनी अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदेशीर लढा कसा द्यायचा, याविषयी माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रत्येकाने नियमित थोडातरी वेळ द्यावा, असे उपस्थितांना आवाहन केले.
जयसिंगपूर येथील प्रवचनानंतर २ जिज्ञासूंची दैनिक सनातन प्रभात चालू करण्याची मागणी
जयसिंगूपर (जिल्हा कोल्हापूर) : येथील ६ व्या गल्लीतील सौ. हिरा कुंभार यांच्या घरी साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सनातनच्या साधिका सौ. शशिकला पाटील यांनी प्रवचन घेतले. साधनेविषयक पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली, अशी प्रतिक्रिया जिज्ञासू श्रीमती राजश्री कुंभार यांनी व्यक्त केली. प्रवचनानंतर दोन जिज्ञासूंनी दैनिक सनातन प्रभात चालू करण्याची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात