प्रभावी हिंदु संघटन करणार्या हिंदु राष्ट्र जागृती सभा !
हिंगणगाव (बार्शी) : १४ मे या दिवशी येथील मारुति मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी या वेळी केले. सभेच्या आरंभी भावपूर्णपणे दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन सौ. संध्या जावळे यांनी केले. येथील सरपंच श्री. बळीराम आबा मारकड आणि उपसरपंच श्री. सौदागर गोरे यांनी सभा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सभेला १५० जणांची उपस्थिती लाभली. सभेत हिंदु धर्म, राष्ट्र, गोमाता, मातृभाषा यांचे रक्षण यावर प्रभावीपणे प्रबोधन करण्यात आले. सभा झाल्यानंतरही धर्माभिमानी जागेवरून उठले नाहीत.
वाहगाव (तालुका कराड) येथे हिंदु राष्ट्र जागृती सभा
कराड : येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. राहुल कोल्हापुरे आणि श्री. महेंद्र निकम यांनी वाहगाव आणि पंचक्रोशीतील धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. सभेच्या ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी युवकांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन श्री. महेंद्र निकम यांनी केले, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होणे हीच छत्रपती संभाजी महाराज यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन श्री. राहुल कोल्हापुरे यांनी या वेळी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात