केरळमध्ये काँग्रेसी नेत्यांनी भररस्त्यात गोहत्या करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. आज कोणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवतो. हिंदुबहुल देशात मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धर्मभावनांप्रती संवेदनशील असणारे शासन हिंदूंच्या धर्मभावनांप्रती असे संवेदनशील केव्हा होणार ? इस्लामिक देशांत जशी ‘पोर्क’वर (डुकराच्या मांसावर) बंदी आहे, काही देशांत घोड्यांच्या मांसावर बंदी आहे, तशी हिंदुबहुल देशात गोमांसावर बंदी आणणे सर्वथा योग्य आहे. शासनाने गोमांसबंदीसाठी कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनीही केंद्राच्या नव्या कायद्याला विरोध करणारा राज्याचा कायदा आणण्याची घोषणा केली. असले प्रकार थांबवण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार देशात गोहत्या करणार्याला जन्मठेपेची शिक्षा घोषित करा, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.