परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उत्तर भारतात हिंदु राष्ट्र जागृती अभियान
उज्जैन (मध्यप्रदेश) – वर्ष २००२ मध्ये भूतान बौद्ध राष्ट्र घोषित झाल्यावर तेथील दीड लाख हिंदूंना हाकलून देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यावेळचे हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेतला होता; पण आज नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आज भारतातून आम्हा हिंदूंना काढून टाकण्यात आले, तर आम्ही कुठे जाणार ? त्यामुळे हिंदूंचेही एक हिंदु राष्ट्र असले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना केले. येथील मौन तीर्थ येथे हिंदु शौर्य जागरण आणि मौनतीर्थ सेवार्थ फाऊण्डेेशन यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले,
१. भारतीय लोकराज्यात चीन आणि रशिया यांच्याशी निष्ठा ठेवणारे कम्युनिस्ट अन् अखंड भारताची फाळणी करणारी मुस्लीम लीग जर स्वतंत्र भारतात राहून देशद्रोही मागण्या करू शकतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात गैर काय आहे ?
२. इंग्लंडमध्ये कॅथलिक पंथाची व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते आणि तेथे प्रोटेस्टंट पंथीय आरामात राहू शकतात. अनेक मुसलमान राष्ट्रांमध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे घेऊन जाण्यास बंदी आहे, तरीही तेथे हिंदू नोकरी करतात. अशाच प्रकारे हिंदु राष्ट्रात मुसलमानही राहू शकतात.
राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ या शब्दामुळे हिंदूंची पिळवणूक होत आहे ! – संत पू. सुमन भाई, उज्जैन
दुबईत मुसलमान आणि मुसलमानेतर दोघांनाही १ मासाचा रमजान ठेवणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे भारतात सर्वांनाच नवरात्रीचे ९ दिवस उपवास ठेवण्यात अडचण का आहे ? भारतात राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ या शब्दामुळे हिंदूंचीच पिळवणूक करण्यात येत आहे. पाक, बांगलादेश आणि भारत या देशांतील मुसलमान एकत्र आले, तर आम्ही अल्पसंख्यांक होऊ शकतो, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती निर्माण करून आम्हाला हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजे.’’
संत पू. सुमन भाई पुढे म्हणाले, ‘‘राज्यघटना तर इंग्रजांनी निर्माण करून भारताला दिली होती. आम्ही आजही घटनेच्या माध्यमातून इंग्रजांचे गुलाम आहोत. याच घटनेच्या आधारावर इंग्रज हिंदूंवर अत्याचार करत होते. मुसलमानांनी फाळणीच्या वेळी पाकच्या बाजूने मत दिले होते. त्यामुळे त्यांना भारतात रहाण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांची निष्ठा पाकशी होती. एखाद्या नेत्याच्या चुकीमुळे मुसलमानांना आम्ही भारतात राहू दिलेही असेल; परंतु नंतर त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा होता.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात