कोल्हापूर : केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करून केंद्र सरकारला आव्हान दिले. या कृत्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड रोष निर्माण होऊन १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या गेल्या. अशा मुजोरांनी किती गोहत्या केल्या असतील, याची कल्पनाही करवत नाही. गोहत्या करणार्या सर्वांची सखोल चौकशी करावी आणि गोहत्या करणार्या केरळ युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भर चौकात फाशी द्यावी, या मागणीसाठी ३१ मे या दिवशी येथील शिवाजी चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी विहिंपचे जिल्हा मंत्रीश्री. श्रीकांत पोतनीस, शहर अध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, प्रखंड प्रमुख श्री. राजेंद्र सूर्यवंशी, बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, आदित्य शास्त्री, किरण दुसे, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, शिवसेनेचे श्री. किशोर घाडगे, करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. केरळ युथ काँग्रेसच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा दिल्या. तसेच या आंदोलनाच्या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी २ गायीही आणल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात