नागपूर : नवेगाव येथील श्री गंगादेवी देवस्थान येथे बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी बालसंस्काराचे महत्त्व, लहान वयातच साधना आरंभ करण्याचे महत्त्व, क्रांतिकारकांनी राष्ट्रासाठी केलेल्या प्राणार्पणाचे महत्त्व विशद केले. या वेळी श्रावणबाळ, छत्रपती शिवाजी महाराज, भक्त प्रल्हाद, भगतसिंह यांच्या कथाही सांगण्यात आल्या. २१ जणांनी याचा लाभ घेतला. शिबिरापूर्वी बाल शिबिरार्थी आणि धर्माभिमानी यांनी मिळून मंदिर स्वच्छता केली.
क्षणचित्रे
१. श्री. दिवाणगुरुजी यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
२. शिबिरानंतर घरी परततांना गुरुजींनी आग्रह केल्याने महाप्रसादासाठी थांबलो. थोड्याच वेळात वादळ आले. महाप्रसादाला थांबलो नसतो, तर मी वादळात अडकलो असतो, असे श्री. अर्वेन्ला यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात