धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी केली शिबिराची उत्साहपूर्ण सिद्धता
पुणे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वडगाव शेरी येथील श्री आईमाता मंदिरामध्ये २८ मे या दिवशी शौर्य जागरण शिबीर पार पडले. शिबिराची संपूर्ण सिद्धता धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी केली होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी ‘शौर्य जागरण’ आणि रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. या शिबिराला ६६ जण उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी सभागृह ठरवणे आणि शिबिराच्या परिसरामध्ये संपर्क करणे आदी सेवा उत्स्फूर्तपणे केल्या.
२. शिबिराच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन १ घंटा भावपूर्ण नामजप केला. त्यानंतर सर्वांनी शिबिराला येण्यासाठी समाजातील लोकांना भ्रमणभाष करून आठवण करून दिली.
३. शिबिरामध्ये १ ‘ब्लॅकबेल्ट’ झालेले कराटे प्रशिक्षक त्यांच्या ८ विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आले होते.
४. एका धर्माभिमान्याने संपूर्ण शिबिराची छायाचित्रे काढली.
५. शिबीर झाल्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी ‘सभागृह तुम्हाला केव्हाही उपलब्ध असेल’, असे सांगितले.
६. शिबीर चालू असतांना श्री अंबामातेच्या मंदिरात आरतीला प्रारंभ झाला, त्या वेळी वातावरण चैतन्यदायी झाले होते. शिबीर झाल्यानंतर पुजार्यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी’ आशीर्वाद दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात