-
रतननगर (नागपूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम
-
धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी
नागपूर : रतननगर येथील श्री सार्वजनिक हनुमान मंदिरात ३० मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी ह.भ.प. विश्वेश्वरराव राऊत यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प्रथम मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एकमेवाद्वितीय कार्य याविषयी माहिती दिली, तर सनातन संस्थेच्या श्रीमती सुषमा बत्रा यांनी साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी २० धर्माभिमानी उपस्थित होते.
प्रवचनानंतर धर्माभिमान्यांनी श्रीहनुमान देवाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आयुरारोग्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले. या वेळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
क्षणचित्र : उपस्थित धर्माभिमान्यांनी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात