ज्योतिर्मठ (उत्तराखंड) – केरळमध्ये गोहत्या करणार्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. यात पुढे म्हटले आहे की, सरकारने या लोकांना शिक्षा करण्याबरोबर वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित होणार्या या घटनेवर बंदी घातली पाहिजे. तसेच काँग्रेसने संबंधितांवर केवळ पक्षातून हकालपट्टीची कारवाई न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याविषयीची पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. आदिगुरु शंकराचार्य यांचे जन्मस्थान असणार्या केरळमध्ये होणारी ही घटना हिंदूंसाठी संतापजनक आहे. सरकारने भविष्यात अशा कृती करण्याचे कोणी धाडस करणार नाही, अशी कारवाई केली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात