हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्यामुळे समाजात जागृती होणे !
१. शासनाने अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण करावे, याविषयी राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद !
शासनाने अयोध्येत भव्य राममंदिर निर्मितीचे कार्य चालू करावे, या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. त्यानिमित्त केरळमधील एर्नाकुलम् जिल्ह्यात श्रीरामनवमीचे औचित्य साधून एका मंदिरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. समितीच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेची माहिती देणारे ए-३ आकारातील प्लाकार्ड मंदिरात लावले होते. त्यावरील विषय वाचून लोक स्वतःहून राममंदिराविषयी निवेदनावर स्वाक्षरी करत होते आणि कुटुंबातील व्यक्तींनाही स्वाक्षरी करण्यास सांगत होते. या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
२. श्रीरामाचे पूजन आणि उपासना यांमागील शास्त्र सांगणार्या व्हॉट्स-अॅप व्हिडिओला इंटरनेट वाहिनीकडून प्रसिद्धी !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीरामाचे पूजन आणि उपासना यांमागील शास्त्र सांगणारे व्हॉट्स-अॅप व्हिडिओ मल्याळम् भाषेत बनवलेे. नंतर त्याला आर्षा टी.व्ही. नामक एका इंटरनेट वाहिनीने चांगली प्रसिद्धी दिली.
३. रामराज्याविषयी सोशल मीडियाद्वारे प्रसार
श्रीरामनवमीच्या निमित्ताने सोशल मीडियासाठी प्रसाराच्या दृष्टीने रामराज्याच्या संदर्भात व्हॉट्स अॅप वरील डी.पी. बनवला होता. तो समितीच्या केरळमधील कार्यकर्त्यांनी स्थानिक भाषेत भाषांतरित केला. या डी.पी.च्या प्रसारासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कृतीशील सहभाग घेतला. काहींनी तो वैयक्तिक व्हॉट्स-अॅप आणि फेसबूकचे प्रोफाइल पिक्चर यांवरही ठेवला.
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात