Menu Close

गोव्यात जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारण्याची हिंदु जनजागृती समितीची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी

प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

पणजी : गोव्यातील महत्त्वाची रुग्णालये, शहरे आणि नगरे या ठिकाणी जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने २ जून या दिवशी अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम वेलजी यांच्याकडे केली आहे. संचालक सलीम वेलजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. संचालक वेलजी म्हणाले, पंतप्रधान कार्यालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला सूचना केली आहे की, जॅनरीक औषधे उपलब्ध करण्यासंबंधी कोणीही अनुमती मागितल्यास प्रशासनाने तत्परतेने त्यांना सहकार्य करावे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, श्री. एकनाथ म्हापसेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी यांचा समावेश होता.

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने वरील मागणी करणारे एक निवेदन संचालक वेलजी यांना सुपुर्द केले. या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी समस्यांनी ग्रासलेले आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी एक चळवळ हाती घेतली आहे. या अंतर्गत समितीने जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारण्याची मागणी केली आहे. आज बाजारात ब्रेंडेड कंपनीची (जॅनरीक) औषधे प्रचलीत ब्रँड नसलेल्या कंपनीच्या समजॅनरीक औषधापेक्षा बर्‍याच वाढीव दराने विकली जातात. समाजातील गरीब लोकांना ही महागडी औषधे घेणे परवडत नाही आणि यामुळे अल्प किमतीत दर्जात्मक जॅनरीक औषध विक्री केंद्रे उभारणे काळाची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रातील रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषधालय खात्याने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना कार्यान्वित केली आहे. तसेच फार्मा सल्लागार मंडळाच्या २३ एप्रिल २००८ या दिवशी झालेल्या बैठकीत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये जन औषधी परियोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र अजूनपर्यंत गोव्यात अशी औषध विक्री केंद्रे स्थापन करण्यात आलेली नाहीत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय जरी रुग्णांना मोफत औषधे पुरवत असली, तरीही अनेक औषधे रुग्णांना विकत घ्यावी लागत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *