जळगाव : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. रणरागिणी शाखेच्या वतीने कु. रागेश्री देशपांडे यांनी पूजन केले, तर कु. तेजस्विनी तांबट आणि कु. सोनिका पोळ यांनी पुष्पहार अर्पण केला. सर्वांनी झाशीच्या राणीचा जयजयकार करून घोषणाही दिल्या.
रणरागिणीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी महिला अत्याचार आणि रणरागिणींचा पराक्रम यांविषयी मार्गदर्शन केले.
धुळे येथेही स्मारकाची स्वच्छता !
धुळे महानगरपालिकेजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारकाची स्वच्छता करून तेथे पूजन करण्यात आले. हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या वेळी घोषणा देऊन हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा करवून घेण्यात आली. समितीचे श्री. पंकज बागुल यांनी राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांच्या संदर्भातील महानगरपालिकेची दुर्दशा आणि महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले.
या वेळी सौ. शीतल सोनजे, कु. तेजस्विनी सोनजे, हिंदु आंदोलन एकता पक्षाचे श्री. मनोज घोडके, अजय माळी, बजरंग दलाचे श्री. गुलाब माळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात