Menu Close

३२ मण सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा !

  • लक्षावधी धारकरी रायगडकडे रवाना होणार !

  • आज आणि उद्या रायगडावर परत एकदा शिवभूपतींच्या पराक्रमाची तुतारी ललकारणार !

पनवेल : हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

त्याच्या प्रचारासाठी पू. भिडेगुरुजी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे उभ्या महाराष्ट्रातून धारकर्‍यांमध्ये अलोट उत्साह पहावयास मिळत आहे. शनिवारी, ३ जून या दिवशी लक्षावधी धारकरी रायगडाकडे रवाना होत आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून परत एकदा शिवभूपतींच्या पराक्रमाची तुतारी ललकारणार आहे. छत्र बसण्याच्या सोहळ्यानंतर परत एकदा भव्य-दिव्य अशा सोहळ्याचे क्षण डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी धारकरी सज्ज झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *