ढाका : एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर बांग्लादेशात हिंसा उफाळून आली आहे. आदिवासींना लक्ष्य केले जात आहे. रंगामतीच्या लोंगाडू उपजिल्ह्यात अदिवसींच्या सुमारे २०० घरांना आगी लावण्यात आली आहे.
जुबो लिग या पक्षाच्या स्थानिक नेत्याचा मृतदेह खगराच्चेरी सरदार-दिघिनाला मार्गावर आढळल्यानंतर मृत्यूला चकमा आदिवासी जबाबदार असल्याचा आरोप करत जमावाने त्यांना लक्ष्य केले. घर आणि दुकानांना आगी लावून लूट सुरू केली आहे. तर आदिवासींना बेदम मारहाण करण्यात आली.
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिनतीला, मानिकजोरा छारा आणि बैठिया पारा या गावातील आदिवासींनी जंगलात धाव घेतली आहे. या हल्ल्यात गुनामाला चकमा या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, असे बांग्ला ट्रिब्युनने म्हटले आहे.
चकमा आदिवासी जमात बांग्लादेशात अल्पसंख्यांक असून, ती भारताच्या अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मिझोराम, मेघालय आणि पश्चिम बंगालच्या काही भागात एकवटलेला आहे.
संदर्भ : प्रभात