केंद्रशासनाच्या पुरातत्व विभागाचा आदेश !
शासनाकडून धार (मध्यप्रदेश) येथील हिंदूंचा वारंवार विश्वासघात !
धार (मध्यप्रदेश) : १२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत. यानुसार सूर्योदयापासून दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३.३० पासून सूर्यास्तापर्यंत हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती असेल. पूजेच्या वेळी हिंदू केवळ काही फुले आणि अक्षताच घेऊन जाऊ शकतील. केवळ १२ फेब्रुवारी या दिवसासाठी लागू केलेला हा विशेष तात्कालीन आदेश आहे.
१. भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण सुरळीत पद्धतीने व्हावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
२. धार जिल्हा प्रशासनाने या यचिकेवर १ फेब्रुवारी या दिवशी जबाब दिला आहे.
३. भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठणाविषयी शासनाकडून जो आदेश दिला जाईल त्याचे पालन होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
४. या प्रकरणामध्ये धार येथील रहिवाशांनी याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वांच्या याचिकेवर एकाच वेळी सुनावणी होणार आहे. वर्ष २०१५ मध्येही या प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
५. गर्दी होऊ नये यासाठी भोजशाळेत वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेशाची अनुमती देण्याची योजना पुरातत्व विभागाकडून बनवली जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात